मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने (heavy rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळे आतापर्यंत १०८ जणांचा बळी गेला आहे. तर कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कोकणातील (Konkan) परिस्थिती यंदा नियंत्रित असून विदर्भात (Vidarbha) मात्र पूरस्थिती कायम आहे.
पुरामुळे २८ जिल्हे आणि २८९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत १२ हजार २३३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे १८९ प्राणी दगावले आहेत. पावसामुळे ४४ घरांचे पूर्णत: तर १ हजार ३६८ घरांचे अशंत: नुकसान झाले आहे.
कोकण (Konkan) विभागात रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ३० जुलैपर्यंत सायंकाळी ०७ ते सकाळी ०६ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच राजापूर कोल्हापूरला जोडणारा अनुस्कुरा घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात २ एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.