200 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानातून अचानक धूर; हवेतच पसरली प्रवाशांमध्ये घबराट…

0

 

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जपानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेव्हा हवेत उडणाऱ्या विमानातून अचानक धूर येऊ लागल्याने 200 प्रवाशांचा जीव धोक्यात आला. विमानातून धूर निघत असल्याचे पाहून पायलटसह चालक दलातील सदस्यांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ऑल निप्पॉन एअरवेजचे (ANA) विमान बुधवारी उड्डाण सुरू असताना त्यातून धूर निघताना दिसल्यानंतर उत्तर जपानमधील शिन चिटोस विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. याबाबत सरकारी प्रसारक NHK ने ही माहिती दिली.

इमर्जन्सी लँडिंगच्या वृत्ताने प्रवाशांना जीवदान मिळाले. प्रवाशांमध्ये बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते. सर्व प्रवासी घाबरले होते. प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याची काळजी वाटू लागली. NHK ने सांगितले की टोकियोहून एएनए फ्लाइटमध्ये सुमारे 200 लोक होते आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान असे सांगितले जात आहे की जेव्हा इंजिन बंद होते तेव्हा विमानाच्या पंखांच्या भागातून येणारा धूर कमी झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.