प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) स्टारर ‘आदिपुरुष’ (‘Adipurush’) चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ह्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता पुन्हा एकदा या चित्रपटासमोरील अडचण हि अजून काही दूर होण्याचं नाव घेत नाही आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दलची एक नवी माहिती समोर आली आहे. कोर्टाने सेन्सॉर बोर्डाकडे (Censor Board) ह्या चित्रपटासंदर्भात उत्तर मागितलं आहे.

‘आदिपुरुष’ या चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. अलाहबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपिठाने ‘आदिपुरुष’ जनहित याचिके संदर्भात उत्तर देण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला नोटीस बजवल्याचं म्हणत या प्रकरणात पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कुलदीप तिवारी (Kuldeep Tiwari) यांनी याबाबतीत जनहित याचिका दाखल केली होती. त्यांनतर आता कोर्टाने सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे. सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न देता टीजर कसा प्रदर्शित करण्यात आला? असं करणं कायदेशीर नाही. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘आदिपुरुष’समोरील अडचणी अजून जास्त वाढून आल्याचे दिसून येत आहे. मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीजर रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

‘आदिपुरुष’बाबत मोठा निर्णय

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात साऊथ सुपरस्टार अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे. तर त्याच्या जोडीला अभिनेत्री क्रिती सेनन आहे. तर अभिनेता सैफ अली (Saif Ali Khan) खानसुद्धा या चित्रपटात आहे. हा चित्रपट रामायणाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये प्रभास आणि क्रिती प्रभू ‘राम’ आणि ‘सीतेच्या’ भूमिकेत आहेत. तर सैफ ‘रावणाच्या’ भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीजरला प्रचंड विरोध करण्यात आला होता. या तिन्ही कलाकारांचे लुक पूर्णपणे विरोधाभास दर्शवत असल्याचं म्हणण्यात आलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.