Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»मेडिकल स्टार्टअप्समुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटी – डॉ.युवराज परदेशी
    उत्तर महाराष्ट्र

    मेडिकल स्टार्टअप्समुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटी – डॉ.युवराज परदेशी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 14, 2023Updated:January 14, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पूर्वी स्टार्टअप ही संकल्पना केवळ आयटी, तंत्रज्ञान व कॉम्यूटरसारख्या मोजक्या क्षेत्रांपुराताच मर्यादित होती. मात्र कोरोना काळात आरोग्य क्षेत्राशी निगडीत अनेक स्टार्टअप सुरु झाले आहेत. त्यापैकी काही युनिकॉर्न क्लबमध्येही दाखल झाले आहेत. म्हणजे त्यांची उलाढाल ८ हजार कोटींच्या वर पोहचली आहे. आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्समुळे ग्रामीण व दुर्गम भागात अत्याधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सेवा व सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य झाले आहे, असे मत स्टार्टअप अभ्यासक डॉ.युवराज परदेशी यांनी व्यक्त केले.

    डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित फाऊंडेशन कोर्सप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना डॉ.परदेशी म्हणाले की, अमेरिकेसह अनेक देशांनी मेडिकल स्टार्टअपवर लक्ष केंद्रीत केले आहे. भारतात मेडिकल स्टार्टअपला उज्वल भविष्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत नवसंकल्पना व नवतंत्रज्ञानाचा वापर, हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

    नेटमेड्स, फार्मईझी, हेल्थीफाय, टाटा हेल्थ, इनोव्हेसर, निरामाई, क्यूअर डॉट एआय यासारखे कितीतरी मेडिकल स्टार्टअप यशस्वीरित्या वाटचाल करत असल्याचे डॉ.परदेशी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप म्हणजे काय? स्टार्टअप इन्क्यूबेशन म्हणजे काय?, फंडिंग कशी उभी करायची? आदींबाबत सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी बायोकेमेस्ट्री विभाग प्रमुख प्रो.डॉ. विठठल शिंदे हे उपस्थित होते.

    #HELTH NEWS #medical #startup आयटी डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज तंत्रज्ञान
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif