दाक्षिणात्य अभिनेता विजयने वाढदिवशी दिले चाहत्यांना ‘हे’ रिटर्न गिफ्ट  

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले नावाजलेले नाव म्हणजे अभिनेता विजय (Actor Vijay) याचा आज दि २२ जुन रोजी वाढदिवस आहे. विजयचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. विजयने त्याच्या चाहत्यांना एक रिटर्न गिफ्ट दिले आहे. त्यानं ‘लियो’ चित्रपटाचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कानगराज देखील चित्रपटातील विजयचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

लियोची स्टार कास्ट

लियो चित्रपटात विजयसोबतच त्रिशा, संजय दत्त, अर्जुन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान, सँडी आणि मायस्किन हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

लियो या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरु आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होईल, असंही म्हटलं जात आहे.पण अजून चित्रपटाच्या टीमनं या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.