अंगावर ऍसिड फेकून देण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0

पाचोरा ;-माझ्याशी लग्न कर आणि माझ्यासोबत चल नाहीतर तुझ्या अंगावर ऍसिड फेकून देईल असे म्हणत एका 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनलागुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलीं आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की समीर सलीम पिंजारी राहणार माहिजी नाका ,पाचोरा हा गेल्या दोन महिन्यांपासून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शाळेत पाठलाग करून शाळेजवळ तिला माझ्याशी लग्न कर व तू माझ्यासोबत चल नाहीतर तुझ्या अंगावर ऍसिड टाकून देईल अशी धमकी देऊन तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले म्हणून त्याच्याविरुद्ध पीडितेच्या आईने फिर्याद दिल्यावरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे करीत आहे दरम्यान आरोपी सलीम याला पोलिसांनी अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.