अज्ञात वाहनाच्या धडकेत चोपडा येथे वृद्ध ठार

0

चोपडा :- अज्ञात वाहनाने दिलेले धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील जुना यावल रोडवरील आशा टॉकीजजवळ ट्रक खाली आल्याने २२ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.

शहरातील भीम नगरमधील आत्माराम दगडू वाघ (वय ७०) हे २२ रोजी सायंकाळी ७.३० वाजेपूर्वी घराकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी डॉ. स्वप्ना पाटील यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्ना पाटील यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.