वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील परप्रांतीय दोघे ठार

0

भुसावळ ;- भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीने जात असलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पिकअप वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामसिंह गमरिया भिलाला वय-४७ आणि मोटला छितरीया भिलाला वय ४० दोन्ही रा. उमरिया ता.भगवानपुरा जि. खरगोन मध्य प्रदेश असे मयत व्यक्तींची नावे आहे.

भुसावळ तालुक्यातील गोजोरा गावाजवळील रस्त्यावरून रामसिंह भिलाला आणि मोटला भिलाला हे दोघे दुचाकी क्रमांक एमपी १० झेडपी ४०१ या दुचाकीने येत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहन क्रमांक (एमएच १५ डीके १५६९) दोघांना उडविले. या घटनेत दुचाकीवरील रामसिंह भिलाला आणि मोटला भिलाला या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत रामसिंह भिलाला यांचा भाऊ शांताराम गमरिया भिलाला याने पिकअप वाहनवरील चालक सुनील मीना जोहरे रा. पिंपळगाव ता. भुसावळ याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.