ई बाईक रिपेअरिंग क्षेत्रात रोजगार निर्मिती

परिवर्तन इनोव्हेशन्स आणि उत्तर महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षण केंद्र यांच्यात सामंजस्य करार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज पेट्रोलच्या वाढीव किंमतीवर किफातशीर विजेवर चालणाऱ्या गाड्या घेण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षात दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. शासन सुद्धा ‘इलेक्ट्रिक बाईक’ खरेदी करण्यास प्रोत्साहन देते आहे. यामुळे सदर गाड्यांच्या किंमती सुद्धा आवाक्यात आल्याचे चित्र सध्या आहे. या धर्तीवर अनेक मोठ्या कंपन्यांसह मेक इन इंडियाच्या सहाय्याने आपले वाहन ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करुन देतंय.

बाजारात ‘ई.बाईक’ विक्री-खरेदीसाठीचे खुप आशादायक असलं तरी या ई बाईक दुरूस्ती आणि देखभालीकरता म्हणावी तशी व्यवस्था अजूनही शहरासह तालुकास्तरावर उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. याचे प्रमुख कारण आहे ई बाईक रिपेअरिंगसाठी लागणारी प्रशिक्षित करणारी वा व्यवसायिक स्तरावर याचे शिक्षण देणारी शासनाची वा खाजगी यंत्रणा नसल्याचे चित्र आहे.

हे चित्र बदलण्यासाठी ई बाईक रिपेअरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी तयार असलेल्या इच्छुकांसाठी ‘रिपेअरिंग आणि मॉडिफिकेशन’ च्या क्षेत्रातले शहरातले परिवर्तन इनोव्हेशन्स, जळगाव आणि आणि तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या सुयोग्य संधी निर्माण करून देणारे उत्तर महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, जळगाव यांच्यात ई बाईक रिपेअरिंगसाठी लागणाऱ्या रोजगार निर्मितीसाठी सामंजस्य करार गुढीपाडवाच्या दिवशी करण्यात आला. सदर करारातून शहरासह ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना यात प्रशिक्षणासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला असुन यात ८०% प्रात्यक्षिकासह अभ्यासक्रम पुर्ततेनंतर १००% नोकरी वा व्यवसायाची संधी प्रशिक्षणार्थींना असणार आहे.

दि.२२ एप्रिल पासून या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात होणार असुन इच्छुक विद्यार्थ्यांनी उत्तर महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षण केंद्रास संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सदर सामंजस्य करारावेळी, परिवर्तन इनोव्हेशन्सचे संचालक निखिल जाधव, उत्तर महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक संचालक मकरंद डबीर यांच्यासह क.ब.चौ.उ.म.वी चे KCIILचे संचालक सागर पाटील, दिपक पाटील, सचिव सॅटर्डे क्लब, हर्षल महाजन, श्वेता मंडपे,  अजिंक्य तोतला, राजु निकम, पंकज व्यवहारे,  नरेंद्र पाटीलआदी उपस्थित होते.

प्रशिक्षण इच्छुकांनी खालील ठिकाणी संपर्क करावा: उत्तर महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्टेडिअम समोर, ला.ना.शाळेच्या बाजूला, जळगाव +91 9370507111 / +91 9923303633

Leave A Reply

Your email address will not be published.