गुडन्यूज ! रेल्वे अनारक्षित विशेष गाड्या चालवणार

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने उन्हाळी अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत.

1. ट्रेन क्रमांक 09037/09038 उधना-भागलपूर-नंदुरबार अनारक्षित विशेष ट्रेन ट्रिप

ट्रेन क्र. ०९०३७ उधना – भागलपूर स्पेशल उधना येथून दिनांक  १३ आणि १६ एप्रिल, २०२४ रोजी ११.२५ वाजता सुटेल आणि भागलपूरला दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९०३८ भागलपूर-नंदुरबार स्पेशल दिनांक १४ आणि १७ एप्रिल २०२४ रोजी भागलपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी नंदुरबारला ०७.३० वाजता पोहोचेल.

थांबा – नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, मोकामा, किउल, जमालपूर आणि सुलतानगंज स्थानकावर थांबेल. गाडी क्रमांक ०९०३७ ला चलठाण आणि बारडोली स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.

रचना – या ट्रेनला द्वितीय श्रेणीचे सामान्य डबे असतील.

 

2. ट्रेन क्रमांक 09039/09040 उधना जयनगर-नंदुरबार अनारक्षित विशेष ट्रेन ट्रिप 

ट्रेन क्रमांक 09039 उधना-जयनगर स्पेशल उधना येथून रविवार, १४ एप्रिल, २०२४ रोजी ११.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या  दिवशी २३.०० वाजता जयनगरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९०४० जयनगर-नंदुरबार विशेष गाडी मंगळवार, दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी जयनगर येथून  ०२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता नंदुरबारला पोहोचेल.

थांबे – नंदुरबार, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आराह, पटना, बख्तियारपूर, मोकामा, बरौनी, समस्तीपूर, दरभंगा आणि मधुबनी स्थानकांवर थांबेल. गाडी क्रमांक ०९०३९ ला चलठाण आणि बारडोली स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.

या ट्रेनला द्वितीय श्रेणीचे सामान्य डबे असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.