कारला बोलेरोने दिलेल्या धडकेत तीन जण गंभीर

0

जळगाव:  इंडिका कारला बोलेरो कारने भीषण धडक दिल्याची घटना येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर खोटे नगर परिसरात उड्डाणपुलाजवळ घडली असून ३ जण गंभीर तर २ जण जखमी झाले आहेत. हा  अपघात हा रविवारी दि. १७ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला.  जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

सचिन सुनील पाटील (वय ३१, रा. खोटे नगर) हे त्यांच्या परिवारासह बाहेर निघाले होते. त्यावेळी खोटे नगर जवळ असलेल्या पुलाजवळ एका भरधाव आलेल्या बोलेरो कारने इंडीचा कारला जबर धडक दिली. यात सचिन पाटील यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर सचिन यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतीक्षा सचिन पाटील (वय २३) यांच्या डोक्याला, हाताला, पाठीला तर मुलगा देवांश सचिन पाटील (वय अडीच वर्षे) याच्या उजव्या हाताला जबर मार लागला आहे. सचिन यांच्यासह त्यांचे सासरे विनोद सोपान पाटील (वय ५१) आणि पत्नीची बहीण नंदिनी विनोद पाटील (वय १९) हेदेखील जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.