जळगावातील शास्त्री दाम्पत्यांचे बॉलीवूड तारकांकडून कौतुक..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आरवी एंटरटेनमेंट्स तर्फे इंडियाज फॅशन लीग 2022 व आरवी आयकॉनिक अचिव्हर्स अवॉर्ड 2022 शेरेटन नवी मुंबईच्या फोर पॉइंट्स या पंचतारांकित हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाने पूर्ण नवी मुंबईचे लक्ष वेधले. याचे आयोजन जळगांव येथील दाम्पत्य संस्थापक रूपा शास्त्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय शास्त्री यांनी केले होते.

शास्त्री दाम्पत्याकडे या कार्यक्रमाचे बौद्धिक संपदा हक्क आहेत. प्रमुख पाहुणे दुसरे कोणी नसून पुष्पाचा हिंदीतील आवाज देणारे श्रेयस तळपदे होते आणि त्यांनीच सर्व पुरस्कर्त्यांना अतिशय आकर्षक अशी ट्रॉफी देऊन पुरस्कृत केले. पुरस्कार विजेत्यांमध्ये अलंकृत सहाय, पायल घोष, निकिता रावल, चाहत खन्ना, राखी सावंत, डॉल्फिन दुबे, राजीव अडातिया, वेरोनिका वनीज, धृती सहारन, अँजेला क्रिसलिंझकी, हिमानी भाटिया, अलंकृत सहाय, लुवेना लोध, केनिशा अवस्थी, चिंकी मिंकी, राजीव अदातिया, निकिता रावल, मेलविन लुईस, राखी सावंत, रितेश सिंह, रोशनी कपूर, खुशी गुप्ता आणि अनेक बॉलिवूड मधील नावाजलेले प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते.

सेलिब्रिटी अँकर सिमरन आहुजाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एस. के. बिल्डर्सचे संचालक डॉ. संजीव कुमार यांचे मौल्यवान मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले. मिड डे, INIFD पनवेल, फोर पॉईंट्स बाय शेरेटन वाशी, नवी मुंबई, इंटेरियर मॉलचे सीईओ कुणाल ठक्कर, मर्सिडीजचे ऑटोहँगर हे कार्यक्रमाचे असोसिएट पार्टनर होते. मिलिंद राणे, अथर्व मीडिया वर्ल्ड, फिरोज शेख शो डायरेक्टर आणि कोरिओग्राफर यश शेलार शो डायरेक्टर आणि कोरिओग्राफर, हरमीत सिंग गुप्ता, प्रोडक्शन हेड, देव अग्निहोत्री, सूरज कुटे, बडिंग पार्टनर, मेकअप पार्टनर, लॅक्मे अकादमी, खारघर, सर्व गिफ्टिंग पार्टनर, सर्व सपोर्टिंग पार्टनर, सर्व डिझाइनर आणि मॉडेल्स, छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर टीम यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमात जळगाव, धुळे, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक येथूनच नव्हे तर दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद व छत्तीसगड येथून सुद्धा मॉडेल्स आणि डिझायनर्स नि आपला सहभाग नोंदवला. हे पुरस्कार म्हणजे नवीन उभरत्या कलाकारांच्या कलागुणांत असलेल्या प्रतिभेचे उत्कृष्ट प्रतिबिंब होय. आमच्याकडे उद्याचे काही उत्कृष्ट सुपरस्टार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.