रुग्णवाहिका चालकांचे मानधन रखडले!

0

ठेकेदाराची मनमानी : अन्यथा कामबंद आंदोलन

जळगाव ;– जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 102 रुग्णवाहिका चालकांचे मानधन गेल्या पाच महिन्यांनासून रखडले असून चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित ठेकेदार उडवाउडवीची उत्तर देत असून ठेका रद्द करावा व मानधन द्यावे अशी मागणी चालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आज शुक्रवारी जिल्हातील रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. निवेदनावर म्हटले आहे की, मुंबर्इ येथील राजछाया इनोव्हेटिव्ह कंपनीकडे जिल्ह्यातील 25 रुग्णवाहिकांचा ठेका दिला आहे. संबंधित ठेकेदाराने गेल्या पाच महिन्यांपासून चालकांचे मानधन दिले नाही. सदर ठेका रद्द करुन तो जिल्हा रुग्णालयाकडून चालविण्यात यावा व थकीत मानधन देण्यात यावे अन्यथा येत्या सात दिवसात कामबंद आंदोलन करण्यात येर्इल असा इशारा चालकांनी दिला आहे. निवेदनावर नितीन तायडे, विजू चेरे, मिलिंद तायडे, कुर्बान तडवी, प्रवीण ठाकूर, अशोक बडगुजर, विजू पांढरे, कुणाल कोळी, योगेश कोळी, गजानन बारी, गौरव जाधव, मनोज पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.