त्वरित शेतीमालाची खरेदी विक्री सुरू करा अन्यथा…

आ. चंद्रकांत पाटलांचा बाजार समितीला कुलूप लावण्याचा इशारा

0

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

गेल्या तीन वर्षांपासून बाजार समितीत शेतीमालाची खरेदी विक्री होण्यासाठी तालुका संघटक शांताराम कोळी हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. मात्र संचालक मंडळाने शेतीमालाची खरेदी विक्री सुरू करण्याऐवजी शांताराम कोळी यांचे विरोध पत्रकार परिषद घेऊन बाजार समितीत शेतकरी मालाची खरेदी विक्री सुरू असून शेतकरी यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा बनाव करण्यात आलेला होता.

त्याच आनुषंगाने शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी यांनी त्यांचा शेती उत्पादित शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला असता, त्यावेळी बाजार समितीत त्यावेळी तिथे कोणीही आडत्या, व्यापारी उपलब्ध नव्हते. शेती माल उठविण्यासाठी हमाल नसल्यामुळे शेतकरी शेतकरी शांताराम कोळी व त्यांचा मुलगा प्रज्वल कोळी यांनी हरबरा माल बाजार समितीच्या ओट्यावर्ती उतरविला असता गेली चार ते पाच तास उलटून गेले होते.

बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्या प्रकारची दखल घेतली. त्यावेळी शेतकरी शांताराम कोळी यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना बाजार समितीत शेतकऱ्यांची होणाऱ्या फसवणुकीबाबत सत्यता सांगितली असता आमदारांनी प्रत्यक्ष बाजार समितीत येऊन सचिवांची खरडपट्टी काढली. तसेच सहाय्यक निबंधक व सहाय्यक आयुक्त यांच्या शेतकरी यांचे शेतीमालाची (कपाशी, मका, ज्वारी, सोयाबीन हरबरा, कडधान्य ) खरेदी विक्री सुरळीत चालू करण्याच्या सूचना दिल्यात तसेच येत्या दोन दिवस शेतीमालाची खरेदी विक्री सुरू नाही केल्यास बाजार समितीला कुलूप ठेवण्याचा इशारा दिला.

तसेच पत्रकार परिषद घेऊन शेतकरी यांची फसवणूक करू नका शेतकऱ्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा मी स्वतः आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. त्यावेळी चिंचखेड सिम येथिल शेतकरी यांनी त्यांचा अनुभव सांगितला. इथे लिलाव होत नसल्याने आम्हाला मलकापूर येथील बाजार समितीत माल विक्रीसाठी जावे लागत असल्याचे निर्दशनास आणून दिले.

यावेळी शेतकरी शांताराम कोळी, विधानसभा प्रमुख सुनील पाटील, नगराध्यक्ष आनंदा पाटील, अ. जिल्हा कार्याध्यक्ष कलीम शेख, ता. प्रसिद्ध प्रमुख अप्पू भांजा, नगरसेवक दिनेश माळी, भास्कर गुरचल, शरीफ मण्यार, राजू भांजा, दीपक कोळी, संदीप कोळी, प्रज्वल कोळी, चिंचखेड सिमचे शेतकरी सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.