मोठी बातमी : लोकसभेच्या तारखांची उद्या होणार घोषणा

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार असून यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुक 2024 चे वेळापत्रक उद्या म्हणजेच शनिवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेच याबाबत माहिती दिली आहे. उद्या दुपारी  3 वाजता या निवडणुकी घोषणा करण्यात येणार आहे. यासाठी आयोगाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका कधी आणि किती टप्प्यात होतीलयाविषयी माहिती देण्यात येणार आहे.

https://x.com/ANI/status/1768531453044736177?s=20

नवनियुक्त आयुक्तांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर पूर्ण आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखासंदर्भात माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यासोबतच उद्या दुपारनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार असल्याचे सांगण्यात येतंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.