प्रवाशी रिक्षाला धडक दिल्याच्या कारणावरून संतप्त ग्रामस्थांनी दोन ट्रॅक्टर पेटवून दिले

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रवाशी रिक्षाला धडक दिल्याच्या कारणावरून संतप्त ग्रामस्थांनी दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना आज ९ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आव्हाने गावातील बसस्थानकजवळ घडली . याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, या अपघातात रिक्षा चालकासह तीन महिला जखमी झाल्याने गावातील संतप्त ग्रामस्थांनी वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला .

आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राहूल बारेला रा. मध्यप्रदेश ह.मु. आव्हाणे ता.जि.जळगाव याच्या मालकीचे दोन ट्रॅक्टर वाळू भरून गावातील बसस्थानक परिसरातून जात होते. यावेळी पुढे जात असलेल्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने जळगाव शहरातून आव्हाणे गावात येत असलेली प्रवाशी रिक्षा (एम.एच.१९,१४१३) हिला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा चालकासह तीन प्रवासी महिला गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर चालकांना जागेवर ट्रॅक्टर सोडून घटनास्थळाहून पसार झाले. अपघातानंतर आव्हाणे गावातील संतप्त ग्रामस्थांनी उभे असलेले दोन्ही ट्रॅक्टर पेटवून दिले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.