धाबे येथे घराला आग ; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

0

पारोळा ;- पारोळा तालुक्यातील धाबे येथील एका घराला आग लागुन संसार उपयोगी वस्तू व रोख रक्कम जळुन लाखों रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील धरणगाव रस्त्यावरील धाबे येथे शॉर्टसर्किटने घराला आग लागल्यामुळे घरातील सर्व साहित्य जळुन खाक झाल्याने लाखोचे नुकसान झाल्याची घटना दिनांक ११ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

गावातील अनिल हिरामण पवार यांचे गावातील दूध डेअरीला लागून असलेल्या घराला आग लागली. रात्री जेवण करून दिवा लावून झोपलेले असतांना जवळील मंदिराची वायर झोपड्यावर पडल्याने अचानक आग लागल्याचे दिसल्यावर तात्काळ अनिल पवार व त्यांचे कुटुंब झोपेतून उठून बाहेर पळाल्याने जीवित हानी टळली. मात्र घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले ६० हजार रुपये रोख जळून खाक झाले.

तर घरातील संसार उपयोगी वस्तू, कपडे, धान्य, भांडी, आदी जळून खाक झाले. रात्री पारोळा नगर परिषदेच्या अग्निशमन बंब चालक मनोज पाटील, जितेंद्र पाटील शेळावे यांच्यासह धाबे गावातील तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले आणि गरिबाचा संसार उघडा झाला या गरीब कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी अनिल पवार व त्यांच्या कुटुंबाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.