Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»नंदुरबार येथे आदिवासी महोत्सवात तडवी भिल जमातीचे पारंपरिक प्रदर्शन…
    ताज्या बातम्या

    नंदुरबार येथे आदिवासी महोत्सवात तडवी भिल जमातीचे पारंपरिक प्रदर्शन…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    जनजातीय गौरव दिवस व राज्य स्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव नंदुरबार येथे आदिवासी महोत्सवाचे महाराष्ट्राचे मा. राज्यपाल यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन झाले.

    महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल जि. जळगाव आयोजित आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव नंदुरबार येथे आदिवासी तडवी भिल जमातीच्या वतीने “आदिवासी तडवी भिल पारंपरिक वन औषधी, खाद्यपदार्थ व हस्तकला प्रदर्शन” ठेवण्यात आलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून विविध मान्यवरांनी स्टॉल ला भेटी दिल्या, यात विशेषतः महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, खासदार हिना गावीत व जि.प.अध्यक्ष नंदुरबार सुप्रिया गावीत यांच्या समवेत आदिवासी तडवी भिल समाजाच्या पारंपरिक हस्तकला स्टॉल दिली तसेच आदिवासी विकास विभागाचे आयुक्त मा. संदीप गोलाईत, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI पुणे येथील संचालक तथा जिल्हाधिकारी चंचल पाटील, ढगळे सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI पुणे, सरोदे सहा.आयुक्त जातपडताळणी विभाग धुळे यांनी तडवी भिल पारंपरिक हस्तकला प्रदर्शन स्टॉल ला भेट दिली. तसेच यावल प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार, धुळे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पवार, यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे सहा. प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, नंदुरबार आदिवासी वसतीगृहाचे अधिक्षक मनोज जमशेर तडवी, दस्तगीर तडवी, जब्बार तडवी, जळगाव वसतीगृहातचे जुम्मा तडवी,  युनुस तडवी, अशरफ तडवी,  लुकमान तडवी, मुराद तडवी, आसीफ तडवी, सद्दाम तडवी, मुस्तुफा तडवी, महिला बचत गटाचे सकिना तडवी आदि उपस्थित होते.

    आदिवासी महोत्सवात आदिवासी तडवी भिल जमातीचच्या वतीने पारंपारिक हस्तकलेच्या वस्तू चाटू, बळगी, ठेसणी, खलबत्ता, रिळ, बाबूंचे टोपली, सुपडा व हस्तकला, चित्रकलेच्या विविध साहित्य व वस्तू खाद्यपदार्थात केळीचे वेफर्स आदि प्रदर्शन व विक्री करण्यात आली. सदर महोत्सवासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल यांचे अधिकारी कर्मचारी व आदिवासी तडवी भिल युवा कृती समितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.

    Aadiwasi Nandurbar Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif