शहरात ठिकठिकाणी “प्रजासत्ताक दिन” उत्साहात साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरात आज ठिकठिकाणी देशभक्ती गीत लावून ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. कोरोना काळानंतर तब्बल २ वर्षांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. चौकात देखभक्ती गीत वाजवून देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना अभिवादन केले आहे. व तसेच त्यांचे आभार मानले आहे. विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने शाळेत प्रजासत्ताक दिन (Republic Day)साजरा करण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली आधीच वर्षात घटना समितीची एकूण १२ सत्रे पार पडली. बाबासाहेबांनी घटनेतील प्रत्येक शब्द अगदी तोलून-मापून आणि सर्व विचाराअंती लिहला होता. तसेच आज देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विविध धर्म, जातीचे लोक एकत्र वास्तव्य करतात आणि हीच भारत देशाची ताकद आहे.

नवी दिल्ली (New Delhi) येथे कर्तव्यपथावर दरवर्षी पथसंचलन, परेड होत असते. याठिकाणी दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) कर्तव्यपथावर दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी नॅशनल वॉर मेमोरियल अमर जवान ज्योती युद्ध स्मारक येथे पंतप्रधान दाखल होतात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो योद्ध्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या योद्ध्यांच्याप्रति एक आठवण म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान याठिकाणी दरवर्षी प्रमाणे यंदाही दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शहीद जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून जवानांना श्रद्धांजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.