कोयता गॅंगची भर रस्त्यावर धिंड

0

लोकशाही न्युज नेटवर्क
धायरी (पुणे) – सिंहगडरोड परिसरातील धायरी येथे एका तरुणावर पाच ते सहा जणांनी कोयत्याने डोक्यात, हातावर आणि मानेवर वार करून गंभीर जखमी केले होते. यामुळे परिसरात कोयता गॅंगची मोठी दहशत निर्माण होऊन नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच सदर तरुणावर खुनी हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते.
दरम्यान सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांना गुप्त बातमीदारामार्फत हे आरोपी गारमाळ येथील एका घरात दबा धरून बसले असल्याची माहिती कळाली. त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अमोल कट्टे व निलेश खांबे यांच्या समवेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले. परंतु, निंबाळकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यानंतर गार मळ्यापासून ते धायरी येथील घटनास्थळा पर्यंत त्यांची पायी रस्त्यावरून धिंड काढली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.