शारदामाई पै यांचे निधन

0

लोकशाही न्युज नेटवर्क
मुंबई – जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. आज दुपारी २ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांचे पुत्र प्रल्हाद पै, कन्या मालन कामत, नातू निखिल पै, स्वप्निल कामत, नातसून प्रिया निखिल पै आणि पणतू यश पै असा परिवार आहे. शारदामाईंच्या जाण्याने जीवन विद्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.
शारदामाई पै यांचे अंत्यदर्शन बोरिवली पूर्व येथील प्रभूसमरण बंगला, ओम सिद्धराज हाउसिंग सोसायटी येथे सायंकाळपर्यंत घेण्यात आले. त्यानंतर बोरिवली पश्चिमेला असलेल्या सद्गुरु श्री वामनराव पै उद्यानाच्या बाजूला वजीरा नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.