सांगवी – हिंगोणा रस्त्यावर भरधाव कारची दुचाकीला धडक

0

लोकशाही न्युज नेटवर्क
मनवेल ता.यावल – सांगवी ते हिंगोणा रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली आहे. जखमी झालेल्या दोघांना यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
लक्ष्मण सपकाळे हे त्यांच्याकडील चारचाकी (एमएच १९ सिझेड ७८०६) वाहनाने फैजपुरकडून यावलकडे येत असतांना समोरून दुचाकीची समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील कलीम सलीम तडवी (वय-२०) रा. साकळी ता. यावल आणि नदीम खान सलीमखान (वय १८) रा. साकळी ता यावल हे दोघे गंभीर जखमी झाले. तर अशपाक बिसमील्लाह तडवी रा . साकळी व चारचाकी वाहन चालक लक्ष्मण नारायण सपकाळे वय ५९ हे अपघात मध्ये कीरकोळ जखमी झाले.धडक दिल्याने दुचाकीवरील कलीम सलीम तडवी (वय-२०) रा. साकळी ता. यावल आणि नदीम खान सलीमखान (वय १८) रा. साकळी ता यावल हे दोघे गंभीर जखमी झाले. तर अशपाक बिसमील्लाह तडवी रा . साकळी सर्व जखमींवर फैजपूर येथील एका खाजगी आहेत.
अपघातस्थळी फैजपुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर, पोहेकॉ राजेश बऱ्हाटे यांनी धाव घेऊन जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. फैजपुर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.