बालकांचे शोषण अन् अधिकार्‍यांचे पोषण! भाग-१५

0

बुरशीयुक्त शेवयांचे पाळेमुळे खोलात : तोच डाव तोच ठेकेदार

जळगाव, दि. 24 –
जिल्ह्यातील अंगणवाड्यांना होणार्‍या शेवयांच्या पुरवठ्याच्या माध्यमातून बालकांचे शोषण अन् अधिकार्‍यांचे पोषण होत असल्याचे समोर आले आहे. गावातील अंगणवाडी मदतनीस वा सेविकेला या शेवयांचा कोण पुरवठा करतो ही माहिती देखील नसून त्या या बद्दल पूर्णत: अनभिज्ञ आहेत. स्थानिक बचत गटाकडे त्याच्या वितरणाची जबाबदारी असून ही सारी खिचळीच झाली आहे.

साहेबांकडे असते माहिती
जळगाव तालुक्यातील शिरसोरी येथील अंगणवाडीला भेट दिली असता, तेथिल सेविकांना हा आहार कुठून येतो, त्याचे निकष काय?, त्याचे वितरण कधी व कसे करावे याबाबत काडीचीही माहिती नसून ही सारी माहिती साहेबांकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीत बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली असली तरी या प्रकरणाने लागलीच शांतीचा मार्ग स्विकारत काही घडलेच नाही असे भूमिका घेतल्याने यात शंका निर्माण झाली असूनही प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही. बहुतांश अंगणवाडी सेविकांना हा आहार कुणाच्या माध्यमातून पुरवठा करण्यात येतो व त्याचे कसे वाटप करावे याचीही कल्पना नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बालकांना सुट्टी आहे मात्र स्तनदा व गरोदर मातांना याचे नित्याने वाटप होणे आवश्यक असताना तेखील त्याला तिलांजली देण्यात येत आहे. तीन महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना सुदृढ करण्यासाठी सरकारकडून पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. त्यात शेवया, उपमा, सातू, शिरा, सुगडी यांचा समावेश आहे. शेवयांमध्ये बुरशी आढळल्यानंतर या शेवया ग्रामीण पातळीवर मोठ्या प्रमाणावर पडून आहेत. तर काही ठिकाणी गरोदर मातांना बळजबरीने त्याचे वितरण करण्यात आले आहे. बालकांना पुरवठा करण्यात येणार्‍या सकस आहाराची परिस्थिती देखील नाजूक झाली असून त्यांची रितसर नोंद बहुतांश अंगणवाड्यांमध्ये नाही. पिछे शाही आगे चलाई या उक्तीने अंगणवाड्यांचा कारभार सुरु असून स्थानिक मदतनीस, सेविका यांना याबाबत माहिती नसल्याचे समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.