14 कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबलं; मलिकांचा गंभीर आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

बनावट नोटांच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मोठ-मोठ्या पदावर बसवलं. नवाब मलिकांनी म्हटलं, अत्यंत गंभीर आरोप करत आहे मी देवेंद्र फडणवीस तुमच्यावर, जेव्हा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली तेव्हा मोदीजींनी सांगितलं की दहशतवाद, काळापैसा संपवण्यासाठी नोटबंदी लागू करत आहे. नोटबंदीनंतर देशाच्या विविध भागात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मध्य प्रदेश, तमिळनाडूत बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

पण 8 ऑक्टोबर 2017 म्हणजेच जवळपास 1 वर्षापर्यंत राज्यात एकही बनावट नोटांचं प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली यावेळी 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचं कनेक्शन हे आयएसआय, पाकिस्तान, दाऊद वाया बांगलादेशमार्फत देशभरात पसरवले जात आहे.

8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त, प्रत्यक्षात 8 लाख 80 हजार दाखवले गेले. मुंबईत एक पुण्यात एकाला अटक केली. यामध्ये इमरान आलम शेख, रियाज शेख आणि नवी मुंबईतून एकाला अटक केली. मात्र, 14 कोटी 56 लाख पकडले गेले आणि 8 लाख 80 हजार सांगत प्रकरण दाबलं गेलं. पाकिस्तानच्या बनावट नोटा भारतात चालवल्या जातात. या प्रकरणात गुन्हा दाखल होतो आणि त्यातील आरोपींना काही दिवसांत जामीन मिळतो. हे प्रकरण एनआयएला दिलं जात नाही.

प्रकरणाचा तपास होत नाही. याचं कारण म्हणजे जे लोक हे रॅकेट चालवत होते त्यांना तात्कालीन सरकारचं संरक्षण होतं. असं सांगितलं गेलं की, पकडलेला काँग्रेसचा नेता आहे. काँग्रेसच्या नेत्याला पकडलं गेलं नाही पण असं होतं की, पकडला गेला तर काँग्रेस नेत्यांवर बिल फाडा. बनावट नोटांच्या प्रकऱणातील आरोपी इम्रान आलम शेख हा अल्पसंख्यांक आयोगाचा अध्यक्ष बनवलेल्या हाजी अराफत शेख याचा छोटा भाऊ आहे. हाजी अराफत शेख याला देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षात घेत अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवलं.

8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त, प्रत्यक्षात 8 लाख 80 हजार दाखवले बनावट नोटांचं थेट पाकिस्तानशी कनेक्शन बनावट नोटा प्रकरणातील आरोपी इमरान हा हाजी अराफत याचा भाऊ तत्कालीन सरकारचा वरदहस्त असल्यानं प्रकरण दाबलं गेलं फडणवीसांकडून हाजी अराफत याला मंडळाचं अध्यक्षपद दिलं एनसीबीच्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत 14 वर्षांपासून एक अधिकारी मुंबईत मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी गुंड्डांना मोठ्या पदावर बसवलं हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीस यांनी बांधकाम कामगार मंडळाचं अध्यक्ष बनवलं

Leave A Reply

Your email address will not be published.