कत्तलीसाठी बारा उंटांना  नेणाऱ्या गाडीसह तिघांना अटक…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाजवळ वरणगाव पोलीसांना नाकाबंदी करीत असताना, सावदा येथून वरणगाव मार्गे मालेगावला कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची तपासणी करून बारा उंटासह तिघांना दि २१ ला बुधवारी रात्री अटक करण्यात आली.

वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील हतनुर गावा जावळ बुधवार दि २१ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सहपोलीस निरिक्षक आशिष आडसुड यांच्या मार्गदर्शनाखाली, पो हे कॉ प्रविण युवराज पाटील व पो हे कॉ नागेंद्र तायडे हे नाका बंदी करून वाहनांची तपासणी करीत असतांना, सावदा मार्गे वरणगावकडे येणारी आयसर ट्रक क्र. सी जी O४ एन.एस २००५ जात असताना त्या गाडीला अडवून तिची तपासणी केली असता गाडीत अमानवी पद्धतीने तांबडसर रंगाचे बारा उंट (त्यातील एक मयत) अंदाजे चार ते पाच वर्षाचे जिवंत आढळले. याबाबत गाडी चालक व त्याच्या दोघ साथीदारांची चौकशी केली असता त्यांनी ऊडवाउडवी उत्तर दिली. पोलीसांनी खाक्या दाखवताच चालक संतोषकुमार भगीरथ वर्मा (५३) रा. पडणा जि राजगड (म.प्र), मुकेश गुरुमूख नायर (५०) रा. कुमटी हसलपुर जि इंदौर, कार्तीक कैलास वर्मा (क्लिनर) (२५) रा. गिदोरी राजगड (म.प्र) यांनी सदरचे उंट हे जावरा जि रतलाम (म.प्र) येथुन मालेगाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. सतरा लाख तीस हजार रुपायाचे बारा उंट व आयशर गाडीसह ताब्यात घेऊन तिघांना अटक करण्यात आली आहे.

या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पो हे कॉ प्रविण पाटील यांच्या फिर्यादीवरून भा द वी कलम ४२९ सह प्राण्याना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्या बाबत अधिनियम कायदा कलम ११ (१), (घ), (च), ( ज) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप निरिक्षक शे इस्माईल शेख हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.