मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) या मालिकेतील वाद कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. अजून हे वाद वाढले असून आता डायरेक्टर असित मोदी (Asit Modi) यांच्यावर कारवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. रोशन भाभी चे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने असित मोदींवर विनयभंगाचा आरोप करून सर्वत्र खळबळ उडवली होती. तिला मलिकेत काम केलेल्या कलाकारांनी समर्थन केले आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या एका अभिनेत्रीने असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेचे निर्माते असित मोदी आणि एग्जीक्यूटिव्ह निर्माते जतीन बजाज आणि त्यांचे साथीदार ऑपरेशनल हेड सोहेल रमानी यांच्याकडून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. आता अभिनेत्रीच्या तक्रारीची दखल घेत तीन जणांविरोधात कलम 354,509 चा अंतर्गत पवई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पवई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.