१ लाखाची लाच भोवली; वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्याला ACB कडून अटक

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर येथे शासकीय कामाचा कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या कंत्राटदाराकरून दोन्ही कामांची बीले पास करण्यासाठी १ लाख १५ हजार रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या वन परिक्षेत्रीय अधिकारी याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून ते शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वनविभागकडून रावेर तालुक्यात ए.एन.आर. रोपवन अंतर्गत त्यांनी चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई-टेन्डरींगच्या पध्दतीने घेतले होते. यापैकी त्यांनी दोन काम पुर्ण केले होते. कामाचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता.

धनादेशाच्या मोबदल्याचे वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन (वय ४५, रा. रावेर ता.जि.जळगाव) यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडी अंत १ लाख १५ हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आज मंगळवारी १८ जानेवारी रोजी सकाळी सापळा रचून तडजोडीची मागणी केली म्हणून अटक केली आहे. संशयित आरोपी लोकसेवक मुकेश हरी महाजन याच्यावर रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.