हार्डवेअर दुकान फोडून ९६ हजारांचा मुद्देमाल लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील नेरी नाकानजीक असलेल्या अशोक हार्डवेअर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ९६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची  उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितू बलराम आहूजा (वय ३४, रा. नानक निवास नवजीवन सोसायटी सिंधी कॉलनी) यांचे शहरातील नेरी नाकाजवळ असलेल्या मटन मार्केटच्या बाजूला अशोक हार्डवेअर नावाचे दुकान आहे. १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच ते साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या बाजूची खिडकीचा पत्रा वाकवून दुकानातून सुमारे ९६ हजार ५०० रुपये किमतीचे प्लॅनेट पॉवर कंपनीचे बोर मशीन, हॅमर मशीन, कटर मशीन आणि डोअरचे ३० किट असा मुद्देमाल लंपास केला.

याप्रकरणी  जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जीतू अहुजा यांनी तक्रार दिली. सदर तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.