लोहारा येथे कृषीदूताद्वारे गावगाड्याच्या शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन

0

लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ ऍग्रीकलचर येथील कृषिदूत गौरव अमृत चौधरी यांचे ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक संलग्नता २०२१/२२ च्या अभ्यास दौऱ्याचे नुकतेच लोहारा येथे मार्गदर्शन झाले.

विशेष म्हणजे कोरोना महामारी सुरूअसल्याचे व तिसरी लाट येणार शासनाचे निर्देश आहेत म्हणून सोशल डिस्टन्स पाळा अशी अगोदर सूचना द्याव्या लागल्या होत्या.  यात प्रामुख्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांना पारंपारिक शेती व्यतिरिक्त फारसे ज्ञान नसते. म्हणून कीड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फवारणी, बीजप्रक्रिया, माती परीक्षण, चारा प्रक्रिया यावर प्रकाशझोत टाकला गेला.

यावेळी शेतकरी रामभाऊ तेली, दीपक चौधरी, अण्णा भिल्ल,सरला चौधरी, पियुष चौधरी, रमेश कोळी, छोटू कोळी, पत्रकार ज्ञानेश्वर राजपुत, प्रवीण तागवले, विशाल गीते, युवराज चौधरी, विशाल बाचेराव, महेश माळी, रविंद्र पाटील, धनराज डांबरे, उषाताई राजपुत, कल्पना चौधरी, आशा चौधरी, भीकुताई तागवाले हजर होते.  कृषिदूत यांना डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाचे प्रा.शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. अनिल फापळे, कार्यक्रम अधिकारी प्रा.वैशाली राणे, प्रा.विशाल दळवी, प्रा. बाळासाहेब मुंडे, प्रा. मोनिका भावसार, प्रा. पी. सावळे, प्रा. अविनाश पासेकर आदींचे मार्गदर्शन लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.