हवाई दलाचे ट्रेनी विमान क्रॅश..

0

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  

मध्यप्रदेशातील भिंडमध्ये भारतीय वायुसेनेच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिराज 2000 हे विमान कोसळूले असून विमानाचा पायलट सुरक्षित आहे. हा अपघात गुरुवारी मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील बाबडी गावात झाला आहे. विमानात आज सकाळी एका प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे.

या अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लेफ्टनंट अभिलाष असे वैमानिकाचे नाव असून ते सुरक्षित आहेत.

हवाई दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार, लेफ्टनंट अभिलाष असे वैमानिकाचे नाव आहे. भारतीय हवाई दलानेही ट्विट करुन या अपघाताची माहिती दिली आहे. तसेच या अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. ‘आयएएफच्या मिराज 2000 विमानात आज सकाळी एका प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. विमान शेताक कोसळले असून, अपघातात पायलट सुखरूप आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.