दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार; संशयित अटकेत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढतच असतांना  तालुक्यातील एका गावात ६ वर्षीय व ७ वर्षीय अशा दोन बहिणींवर तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याची केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे.

तालुक्यातील एका गावात दोन्ही चिमुकल्या मुली कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. बुधवार, २० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या  सुमारास गावातच राहणारा तरुण मुलींच्या घरी गेल्या. यादरम्यान त्याने दोघी  चिमुकल्या बहिणीसोबत अश्‍लिल चाळे करत दोघांवर लैगिंक अत्याचार केला.

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी नशीराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरुन याप्रकरणी अत्याचारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून  संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल मोरे करीत आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत संशयित तरुणास न्यायालयात हजर करण्याची कारवाई सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.