शाहरुख खानच्या मन्नतवर NCB चं पथक; अनन्या पांडेला समन्स

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात  आर्यन खानला एनसीबीने अटक केली आहे. त्याच दरम्यान आता एनसीबीची एक टीम अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतील मन्नत या निवासस्थानी दाखल झाली. मन्नत निवासस्थानी जवळपास अर्धा तास एनसीबीची टीम उपस्थित होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमचा तपास सुरू आहे, साक्षीदार आणि संशयित दोघांनाही चौकशीसाठी बोलावले जाते. मन्नतमध्ये कोणालाही चौकशीसाठी नोटीस देण्यात आलेली नाहीये. हा एक तपास प्रक्रियेचा भाग आहे.

दरम्यान आज बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर जेलमध्ये पोहोचला होता. यावेळचे शाहरुखचे काही व्हिडीओ आणि फोटो देखील समोर आले होते. शाहरुख खान आणि आर्यन यांच्यात जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

कोर्टाने त्याचा जमीन काल पुन्हा फेटाळून लावला आहे. आर्यन खानचा जामीन काल न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी या तिघांच्या जामिनावर सुनावणी ठेवली आहे. बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीच्या घरावर एनसीबीचा छापा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरावर एनसीबीने गुरुवारी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीला क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडच्या या यंग जनरेशनमधील अभिनेत्रीचेही चॅट आढळून आले आहे. एनसीबीच्या हाती लागलेल्या चॅटमध्ये तो या अभिनेत्रीसोबत ड्रग्जबाबत चर्चा करताना आढळले आहे. एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले आहे. असेही म्हटले जात आहे की अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीने तिला जाऊ दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.