धक्कादायक… चोरट्यांनी थेट एटीएम मशीनचं लांबवले..

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे गाव म्हणजे धानोरा येथील महत्वाची बातमी आहे. धानोरा येथील इंडिकॅश एटीएम अज्ञात चोरट्यांनी उचलून नेले आहे. यामुळे धानोरा गावासह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  यापूर्वी दोनदा देखील इंडिकॅश एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून  अज्ञात चोरट्यांनी यश मिळाले नसून मात्र बुधवारी रोजी मध्यरात्री मध्ये इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीनच अज्ञात चोरट्यांनी चोरून घेऊन गेले.

तसेच धानोरा गाव आहे.  चोपडा यावल जळगाव चौफुली वरील धानोरा गाव असून येथील बस स्थानकावरील एटीएम मशीन चोरीला गेले असून सदर चोरट्यांनी एटीएम मशीन उचलून नेले आहे.  यात  दीड लाख रुपये कॅश असल्याचे समोर येत आहे.  आज गुरुवार सकाळी सात वाजेला सदर प्रकार उघडकीस आला.  गावातील नागरिकांच्या लक्षात येताच  गावातील पोलीस पाटील यांच्या कानावरती माहिती टाकली असून व त्यांनी आडावद पोलीस ठाण्यात तातडीने संपर्क साधला.

यावेळी  घटनास्थळी पाहणीसाठी आडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, कादर शेख यांच्यासोबत कर्मचारी पंचनाम्यासाठी आले असून त्याच रस्त्यावर पुढे असलेले सद्गुरु स्वीट नमकीनवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यासाठी ताब्यात घेतले आहे.

सदर दरोडा हा रात्री  २.३०  ते ३ वाजेच्या दरम्यान पडला असल्याची  शक्यता वर्तवली जात आहे.  एटीएम उचलून नेल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.  यापूर्वी देखील दोन वेळेस इंडिकॅश एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाले होते, गेल्या काही वर्षात एटीएमच्या बाहेरील सुरक्षा रक्षक कमी केल्यामुळे या घटना सातत्याने घडण्याचे प्रमाण वाढले आहे.   तसेच पुढील तपास अडावद ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.