स्व. उत्तमराव पाटील यांच्या सहवास लाभलेला प्रत्येक कार्यकर्ता भाग्यवान -खा. उन्मेष पाटील

0

चोपडा – स्व उत्तमराव पाटील हे भाजपचे महाराष्ट्र चे निर्मीती चे शिल्पकार ,देशाचे जनसंघाचे अध्यक्ष अश्या थोर नेत्याचा सहवास ज्या ज्या कार्यकर्त्यांना लाभले ते भाग्यवान होते,असे प्रतिपादन जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी चोपड्यात केले आहे.

आज सायंकाळी सात वाजता चोपडा शहरातील गणेश कॉलनी मधील हातेड आश्रमशाळे चे चेअरमन राजेंद्र सोनवणे याच्या निवासस्थानी उन्मेष पाटील यांनी स्व उत्तमराव पाटील यांच्या फोटोला पूजन करून त्याच्या कार्याबाबत माहिती दिली.

उन्मेष पाटील यांनी सांगितले की,स्व उत्तमराव पाटील यांच्या सामाजिक राजकिय क्षेत्रातून सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी राज्यावर पाठवले.उत्तमराव पाटील यांच्या नावाची शाळा काढून त्याचे ऋण फेडण्याचे काम राजेंद्र सोनवणे कार्यकर्ते म्हणून करीत आहेत.यावेळी चाळीसगाव येथील माजी प स सदस्य दिनेश बोरसे,चोपडा भाजपचे हिम्मतराव पाटील,लक्ष्मण पाटील, आत्मराम सोनवणे,हातेड आश्रम शाळेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे,सचिव मीनाक्षी सोनवणे,संचालक सागर सोनवणे,पूजा सोनवणे,पल्लवी सोनवणे ,श्रावण राठोड  आदी हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.