चोपडा येथे गुर्जर अळीत तुळशी विवाह उत्साहात

0

चोपडा- शहरातील गुर्जर अळी भागात शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवून आज कार्तिकी एकादशी च्या दिवशी आज तूळशी विवाह संपन्न झाला असून यावेळी शहरातील पुराणिक मिलिंद जोशी यांनी विवाह मंत्राद्वारे तुळशी आणि दामोदर यांचे विधिवत लग्न यावेळी लावण्यात आले.

गुर्जर अळी भागातील शिवसेनेचे नगरसेवक उद्योजक राजाराम पाटील यांनी तुळशी ला मंगळसूत्र घालून विधिवत पूजा केली. यावेळी तुळशी विवाह वेळी अंतरपाट धरून ज्ञानेश्वर पाटील व दीप राजाराम पाटील यांनी तुळशी आणि दामोदर यांचा विवाह यावेळी लावला होता.
एक तास हा तुळशी विवाह यावेळी पार पडला यावेळी नगरसेवक राजाराम पाटील यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली होती.या तुळशी विवाह वेळी गुजर अळी भागातील जेष्ठ नागरिक जानकीराम पाटील,भावलाल पाटील,अशोक पाटील,ज्ञानेश्वर पाटील,सुनील पाटील,गौरव शिंदे,निलेश राजपूत,चैतन्य पाटील,आदी सह मोठ्या संख्येने महिला भगिनी हजर होत्या.चोपडा शहरातील गुर्जर अळी भागात अनेक वर्षाची ही परंपरा असल्याचे नगरसेवक राजाराम पाटील यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.