स्टाफनर्सचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव  शहरातील एका हॉस्पिटलमध्ये  काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी  एकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

शहरातील २३ वर्षीय तरूणी एका हॉस्पिटलमध्ये स्टाफनर्स म्हणून काम करते. शनिवार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास काम करत असतांना संशयित आरोपी विजय चौधरी उर्फ पल्टी (वय २४, रा. रथ गल्ली, पारोळा) याने हॉस्पिटलमध्ये येवून स्टाफनर्स तरूणीला अश्लिल शिवीगाळ करून विनयभंग केला.

हा प्रकार सहन न झाल्याने तरूणीने पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विजय चौधरी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.