राज्यात पुढील 4-5 दिवस मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत आहे. तसेच पूर्व पश्चिम वाऱ्यांचा वेग चांगला असल्याने दक्षिणेसह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. देशासह महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता काहीशी कमी झाली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात चक्रीय स्थितीत रुपांतर होत असल्याने विदर्भात आजपासून पुढील 2 दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात देखील पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

प्रामुख्याने उत्तर कोकणात धुवांधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 7 आणि 8 सप्टेंबर रोजी उत्तर कोकणातील काही भागात अतिवृष्टीची होऊ शकते. दरम्यान मुंबईसह अनेकठिकाणी आजसाठी यलो अलर्ट आहे तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रातील 8 सप्टेंबर रोजी काही भागात अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आजसाठी मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 7 आणि 8 सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात पुढील 3 दिवस देखील मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

ज्यात प्रामुख्याने उत्तर मराठवाड्यात 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात पुढील 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मागील 3-4 दिवस विदर्भात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यात हाच जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. उद्यासाठी संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.