अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; गुन्हा दाखल

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा शहरातील १६ वर्षीय  मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. ४ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आकाश भाऊसाहेबर गायकवाड रा. श्रीरामपूर जि.अहमदनगर याने फूस लावून पळवून नेले.

दरम्यान पिडीत मुलगी अल्पवयीन असून पालकांच्या रखवालीतून तिला पळवून नेले आहे. मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आकाश गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.