सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार झाल्याने आज सोन्याचांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची वायदे किंमत 0.6% नी कमी होऊन 46,377 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर देखील गुरुवारी कमी झाले आहेत. गेल्या  काही महिन्यातील ही चांदीतील सर्वाधिक घसरण आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरात 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर स्थिर बंद झाले होते तर चांदी 1.2 टक्क्यांनी वधारली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. स्पॉट गोल्डची किंमत 0.3 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1,762.33 डॉलर प्रति औंस झाली आहे. डॉलर इंडेक्स एका महिन्याच्या उच्च स्तरावर आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते, गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 46,360 रुपये प्रति तोळा आहे.

तर चांदीचे दर 1100 रुपयांच्या तेजीनंतर 60,900 रुपये प्रति किलोवर आहेत. नवी दिल्ली आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे 46,000 रुपये आणि 45,360 रुपये प्रति तोळा आहे. वेबसाइटच्या मते चेन्नईमध्ये हा दर 44,110 रुपये प्रति तोळा आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,180 रुपये प्रति तोळा आहे तर मुंबईत सोन्याचा दर 46,360 रुपये प्रति तोळा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.