बगीच्यातील विहीरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी उद्यान, मेहरूण बगीच्यातील विहिरीत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेह विहीरीत असल्याची माहिती मिळाल्यावर  एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गफ्फार तडवी, साईनाथ मुंडे, चंद्रकांत पाटील, नरसिंग पाडवी आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली.

पोलीस मित्र समाधान नाईक व राहुल कोळी यांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. सदरचा अनोळखी मयत इसम हा गेल्या तीन दिवसापूर्वी विहिरीत पडून मयत झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेह सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.