सोनू सूदच्या घरी आयकर विभागाची टीम; 6 ठिकाणी केली पाहणी

0

नवी दिल्‍ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या मुंबई स्थित घरावर आयकर विभागाची टीम पोहोचल्याचं वृत्त समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाची टीमने सोनूच्या घराचा सर्वे केला आहे. आयटी विभाग मुंबईत अभिनेता सोनू सूदच्या 6 भागांमध्ये एक सर्वेक्षण अभियान सुरू आहे. कोरोना महामारीच्या  दरम्यान सोनू सूदने गरजूंना मोठी मदत केली आहे. माध्यमांसह सर्वसामान्यांनी सोनूच्या कामाचं मोठं कौतुक केलं आहे. कोरोना महामारी वेळेस  घरी परतणाऱ्या मजुरांना सोनूने वाहनांची व्यवस्था करून दिला, तर अनेकांना आर्थिक साहाय्य केलं.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घराचा आयकर विभागाकडून सर्वे करण्यात आलं. आयकर विभागची  टीम सकाळी सोनू सूदच्या घरी गेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी विभागाने सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणच सर्वे केला. मात्र कोणत्याही वस्तू वा कागदपत्र जप्त करण्यात आले नाहीत.

आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 133 ए नुसार सुरू असलेल्या ‘सर्वे अभियानात’ आयकर अधिकारी केवळ व्यावसायिक भाग आणि त्याच्याशी संबंधित भागांची पाहणी करू शकतात.  लॉकडाऊनमध्ये सोनूने खूप लोकांना मदत केली होती. त्यामुळे देशभरात सोनूची मोठी चर्चा झाली होती. अनेकांनी तर त्याचं मंदिरदेखील बांधलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद राजकारणात येऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.