पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत नमो रथाला हिरवा झेंडा

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत नवभारत महोत्सवद्वारे माननीय पंतप्रधानांचे विविध  योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोचवून सेवाभाव समर्पित करावा, यासाठी जिजामाता चौक, नगरपरिषद जामनेर येथे नमो रथाला हिरवा झेंडा माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे यांचे शुभहस्ते दाखविण्यात आला.

माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे, नगराध्यक्षा साधनाताई महाजन, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, प्रदेश सचिव भैरवी ताई पलांडे, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शहराध्यक्ष अतिश झालटे, तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, युवा तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.