सेन्सेक्स ५०० अंकांनी गडगडला

0

एक्जिट पोल सरकारच्या विरोधात गेल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.

मुंबई –

एक्जिट पोल भाजपा सरकारच्या विरोधात गेल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स सकाळी ४७८.५९ अंकानी घसरुन ३५,२०४.६६ वर सुरु झाला. तर निफ्टीमध्येही १८५ अंकाची घसरण झाली. निफ्टीची १०,५०८.७० अंकावर सुरुवात झाली. सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी सेन्सेक्स ५७९ अंकानी घसरून ३५,०९३ वर तर निफ्टीमध्ये १७७ अंकाची घसरण होत १०,५१६ अंकावर गडगडला.

शुक्रवारी आलेल्या एक्जिट पोलमध्ये राजस्थानमध्ये भाजपाकडून सत्ता जाईल तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसबरोबर अटीतटीची लढत होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या तीन राज्यांबरोबरच तेलंगणा आणि मिझोराममध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होईल.

दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजाराने दिवसभर चांगली कामगिरी केली होती. दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स ३६१ अंकांच्या तेजीसह ३५,६७३ वर तर निफ्टी ९२ अंकाच्या तेजीसह १०,६९३ वर बंद झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.