हिरापूर येथे शेतकर्‍याचा संशयास्पद मृत्यू

0

पारोळा,दि. 9 –
हिरापूर ता पारोळा येथील शेतकरी रविंद्र भगवान पाटील यांचा शेतातील झोपडीत संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिरापूर ता पारोळा येथील शेतकरी रविंद्र भगवान पाटील(32) हे आज दि 8 रोजी सकाळी 10 वाजता घरून कपाशी चे पळकाठ्या उपटण्याचे करण्यासाठी पत्नी संगीता हिला सांगून शेतात निघाले सायंकाळी 5 वाजले तरी पती घरी न आल्याने पत्नी ने गावातील दोन तीन मुलांना शेतातुन पती अजून आले नाही असे सांगितले तेव्हा काही जण रविंद्र पाटील यांना पाहण्यासाठी शेतात गेले तर त्यांचा शेतातील झोपडीत रवींद्र पाटील हे बसलेल्या अवस्थेत गळ्या भोवती दोराचा होता आणि अंगात बनियन ऐवजी महिलेचे ब्लाऊस परिधान केलेले होते मग घाबरत रविंद्र पाटील यांच्या पत्नी ला भावाला रविंद्र पाटील संशयास्पद मृत अवस्थेत झोपडीत पडलेले आहे पत्नी संगीता सह नातेवाईकांनी शेतात धाव घेतली आणि रविंद्र याना मृत अवस्थेत पाहून पत्नी संगीता हिने हंबरडा फोडला भाऊ महेंद्र याने माझा भाऊ करू शकत नाही त्याचा घातपात करून मारले आहे त्यांचा मृत्यू हा संशयास्पद आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.
पारोळा पोलिस स्टेशन येथे महेंद्र भगवान पाटील यांच्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्यु 102/2018 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.