सुप्रसिध्द फोर्ब्स मासिकात अनिल जैन यांची मुलाखत

0

पाण्याच्या वापरासंदर्भातील नाविन्यपूर्ण संशोधन व प्रयोगांचा गौरव

जळगाव, दि. 7 –
जगभरातील व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि अर्थ व्यवहार याविषयी अत्यंत ताज्या, लक्षवेधी आणि महत्त्वाच्या विषयांवर मजर्सी सीटीफ येथील मुख्यालयातून फोर्ब्स मासिक दर पंधरा दिवसांनी सुमारे 35 भाषांमधून प्रसिध्द होते. जगभरातील सर्वच क्षेत्रात या अंकाचे 70 लाखांवर वाचक आहेत. या अंकासाठीच्या अन्न व जल या विषयातील तज्ज्ञ पत्रकार लॉरिन फ्रेइस या जगभरातील अन्न व जल संदर्भातील नवे संशोधन किंवा प्रयोग हे पर्यावरणपूरक कार्य कसे आहेत ? यावर वृत्त मालिका लिहित याच मालिकेत त्यांनी जगभरात ठिबक सिंचन क्षेत्रात अग्रेसर व जळगाव येथे मुख्यालय असलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स या कंपनीचे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक अनिल भवरलाल जैन यांची उष्ण आणि तहानलेल्या पृथ्वीवर पुरेशा जलसाठी नवसंकल्पना या सदरात मुलाखत प्रसिध्द केली आहे.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तंत्र कसे उपयुक्त ठरते आहे याविषयी इतर उहापोह अनिल जैन यांच्या उत्तरांमधून होत जातो. जगभरात मानवाच्या रहिवासासंदर्भात संकट निर्माण करणारे पाच अत्यंत आव्हानात्मक विषय सध्या चर्चेत आहेत. यात पृथ्वीवरील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 70 कोटी लोकसंख्या पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही म्हणून मूळ निवासापासून विस्थापित झाली आहे. येत्या 11 वर्षांत 2030 अखेरीस पाण्यासाठीचे विस्थापन होण्याची संख्या वाढेल, या संकटाच्या पार्श्वभूमिवर अनिल जैन यांची मुलाखत महत्त्वपूर्ण आहे. या लेखातील काही लक्षवेधी मुद्दे …

पिण्यासाठी पूरेसे पाणी उपलब्ध होत नसताना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून का चिंताग्रस्त व्हायला हवे ? या प्रश्नावर अनिल जैन म्हणतात, आम्हाला नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारे बहुतांश पाणी विविध गरजांसाठी वापरले जाते. यातील 70 टक्के पाणी अन्न व शेती उत्पादनांसाठी वापरले जाते. भारतात हेच प्रमाण 80 टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्न व पाण्याची मागणी वाढते आहे. भारताची लोकसंख्या सन 2030 पर्यत आणखी 100 कोटीने वाढण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत अन्न व जल विषयक प्रश्न आणखीनच गंभीर आम्ही कृषि आधारित उद्योगात अग्रेसर आहोत. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबापासून धान्य उत्पादन कसे वाढवावे ? यासाठीच आम्ही नव नवे संशोधन करीत आहोत. यातूनच शेतीसाठी पाणी कमी लागेल आणि ते पिण्यासाठी वापरता येईल.

गेली चारवर्षे सतत जागतिक तापमान वाढले असून सर्वांत उष्ण दिवसांचा अनुभव आला आहे. हवामानातील या प्रतिकूल पाण्याची उपलब्धता व कृषिसाठी वापरावर काय परिणाम होईल ? या प्रश्नाच्या अनिल जैन म्हणतात, हवामानबदलामुळे जगभरातील जलचक्र विस्कळीत झाले आहे. नैसर्गिक मार्गाने मिळणारे पाणी आणि भूगर्भातील जलसाठे कमी होत असून त्यात क्षार वाढल्याने पिण्यालायक तसेच सिंचनक्षम गुणवत्ता कमी होते आहे. आयपीसीसी संस्थेच्या अहवालानुसार अवघे 1.5 अंश सेल्सिअस तापमान तरी भारतासारख्या देशात कृषि आधारित अर्थव्यवस्था विस्कळीत होते. भारतात भिषण टंचाईसह दुष्काळ, अशी नैसर्गिक आपत्ती येते. या बरोबरच कृषि उत्पादनात परिणामकारक घट होते. जेव्हा की भारतात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कुपोषित समाज घटकांची संख्या लक्षणिय आहे. जागतिक तापमान जर 1.5 ते 2 अंश सेल्सिअस जर वाढले तर संपूर्ण पृथ्वीवर टक्के भूभाग हा पाणी टंचाई वा अवर्षणग्रस्त होईल अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली त्याचवेळी आपण नैसर्गिकरित्या मिळणारे 70 टक्के पाणी वापरुन टाकत आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.