गीतांजली एक्सप्रेसचा अनर्थ टळला

0

भुसावळ दि . 7 –
भुसावळ रेल्वे स्थानक क्रमांक एक वर आज दुपारी आलेल्या गीतांजली एक्सप्रेस या गाडीच्या बोगीस आग लागण्याची होती मात्र वेळीच गाड़ी तपासणी करणारे दोघे रेल्वे कर्मचारी यांच्या ही निदर्शनास आल्याने पुढील अनर्थ टळला व प्रवाश्यांचा जीव वाचला . दरम्यान त्वरित गाडीची बोगी काढण्यात येऊन दुसरी बोगी लावून गाडी पुढे रवाना करण्यात आली या प्रक्रियेमुळे सुमारे पावणे दोन तास उशिराने गाडी रवाना झाली.
भुसावळ रेल्वे स्थानक क्रमांक वर आज दिनांक 7 रोजी दुपारी अप हावडा गीतांजली एक्सप्रेस दुपारी 4. 30 वाजता आली . त्यावेळेस सी अँड डब्ल्यू विभागाचे चे कर्मचारी गजेंद्र सणस व मनोज जनार्दन चौधरी हे रोलिंग चेकिंग करीत होते तेव्हा त्यांनी बघीतले की गाडी क्रमांक 12860 या गाडीचा बोगी क्रमांक 142374 या बोगीच्या चाका हॉट एक्सेल 102 डिग्री गरम झाले यामुळे गाडीला आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यावेळेस या दोघांनी त्वरित वरिष्ठ अधिकारी यांचेशी संपर्क साधला व सर्व हकीकत सांगितली . या स्लीपर बोगीला डिक्टेट करण्यास सांगितले व लगेच या बोगीला बाजूला करण्यात आले . त्या ठिकाणी दुसरी बोगी जोडण्यात आली गाडीला पुढील मार्गास रवाना केले ही गाड़ी भुसावळ रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 6. 15 वाजता निघाली . सुमारे पावणे दोन तास गाडी उशिराने निघाली . यामुळे प्रवाश्यांची मात्र गैरसोय झाली . गजेंद्र सणस व मनोज चौधरी या कर्मच-यांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रवाश्यांचे प्राण वाचले म्हणून सी अँड डब्ल्यू च्या या दोन्ही सर्वत्र कौतुक होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.