साडेतेरा कोटींच्या विकासकामांचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते भूमीपूजन

0

लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा

पाचोरा व भडगाव तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या तितुर नदीवरील बाळद येथील पुल बांधकाम करणे, पाचोरा नगरदेवळा दरम्यान नाचनखेडा, बाळद, अंतुर्ली आदी ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्ती करावयाच्या तब्बल साडेतेरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील व माजी जि. प. उपाध्यक्ष प्रकाश सोमवंशी यांची उपस्थिती होती. मोठे व लहान बाळद गावातून वाहत गेलेल्या तितुर नदी मुळे दोघे थंडीला असलेल्या गावातील लोकांची गैरसोय होऊन वाहनधारकांसह सर्वानाच मोठ्या फेऱ्याने ये – जा करावी लागत होती. यामुळे वेळोवेळी ग्रामस्थांनी तितुर नदीवर पुलाची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आ. किशोर पाटील यांनी तब्बल ८०० लक्ष रुपयांच्या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाचे तसेच गाळण ते बाळद रस्त्याचे डांबरीकरण करणे ४६७ लक्ष, अंतुर्ली बाळद रास्ता सुधारणा व डांबरीकरण करणे १०४ लाख अशा तब्बल साडेतेरा कोटी रुपयांच्या विकासकामांची मंजुरी मिळवत या विकास कामांचे भूमिपूजन केले. तसेच जनतेतून मागणी असलेल्या नगरदेवळा स्टेशन ते नाचनखेडा कामाचे टेंडर अंतिम टप्प्यात असून लवकरच त्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

त्यावेळी उपजिल्हा प्रमुख अभय पाटील, सरपंच जोतीबाई सोमवंशी, मा. सभापती पंढरीनाथ पाटील, अंबादास सोमवंशी, यादवराव सोनवणे, प्रवीण ब्राम्हणे, वसंत जिभु पाटील, धर्मेंद्र पाटील, महेंद्र पाटील, पियुष राजपूत, तुळशीराम मोरे, संदीप पाटील, नगरसेवक महेश सोमवंशी, भास्कर पाटील, नूर बेग मिर्झा, धनराज चौधरी, जितेंद्र परदेशी, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, ठेकेदार मनोज पाटील, बांधकाम अभियंता दिपक पाटील यासह परिसरातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.