जामनेरमध्ये आजपासून प्रिकॉशन डोसला सुरुवात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व वय वर्षे ६० वरील सहव्याधी असलेले नागरिक यांच्या प्रिकॉशन डोसला आजपासून सुरवात करण्यात आली.

जामनेर तालुक्यात ६० वर्षांवरील नागरिकांना पहिला प्रिकॉशन डोस देण्यात. त्यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे, जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. हर्षल चांदा, मुख्याधिकारी नगर पालिका चंद्रकांत भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. सागर पाटील, गटनेते न. पा. जामनेर डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक सुहास पाटील, सुहास चौधरी, तालुका मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच. माळी, आरोग्य साहाय्यक पुंडलिक पवार, सुनील पाटील, आरोग्य सेविका कविता नवघरे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्या हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व ६० वर्षेवरील सह व्याधी असलेल्यांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असतील अशा लाभार्थींनाच प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. अशा लाभार्थ्यांना कोव्हीन सिस्टीम मधून प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबर वर एस. एम. एस. प्राप्त होणार आहे.

पूर्वी नोंदणी न केलेल्या हेल्थ केयर वर्कर्स फ्रंट लाईन वर्कर्स यांना विहित नमुन्यात नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. जामनेर तालुक्यात एकूण १५८६ हेल्थ केयर वर्कर्स ३०१९ फ्रंट लाईन वर्कर्स व २५३१४ साठ वर्षे वा अधिक वयाच्या सहव्याधी असलेल्या लाभार्थींना प्रिकॉशन डोस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.