सहा विद्यार्थ्यांची सक्षम राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी दिल्ली येथे निवड

0

चोपडा  – येथील विवेकानंद विद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस गव्हर्मेंन्ट ऑफ इंडिया आयोजित सक्षम राष्ट्रीय चित्रकला व निबंध स्पर्धा दिल्ली याठिकाणी शेवटच्या फेरीसाठी निवड.

यात चित्रकलेसाठी हर्षदा सचिन बडगुजर, साक्षी किशोर पाटील, खुशी शशिकांत शिंदे, साक्षी प्रकाश जाधव. निबंधासाठी निकिता सुनील धनगर, खुशी शशिकांत शिंदे यांच्या चित्रांची व निबंधाची निवड झाली त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांची प्रेरणा तर कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते, उपशिक्षिका माधुरी हळपे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन, कौतुक व पुढील अंतीम फेरीसाठी शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अ‍ॅड.रवींद्र जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका वासंती नागोरे यांच्यासह संस्थेचे विश्वस्त मंडळ शिक्षकवृंद, पालकवृंद व विद्यार्थ्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.