न.ह.रांका विद्यालयात श्री.आर.वाय.मोरे यांचा सत्कार समारंभ संपन्न

0

बोदवड – नुकताच येथील न.ह.रांका विद्यालयात दि.बोदवड सार्वजनिक को- ऑफ एज्युकेशन सोसायटी लिमिटेड बोदवडचे चेअरमन श्री.मिठूलालजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रयोगशाळा सहाय्यक श्री.आर.वाय.मोरे यांना निरोप देण्यात आला.

सदर कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अजय जैन, ज्येष्ठ संचालक श्रीराम बडगुजर, श्रीकृष्ण कुलकर्णी, अशोक जैन, बोदवड येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा व्यापारी संघाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.जे. बडगुजर,उपप्राचार्य पी.एम.पाटील, पर्यवेक्षक आर. आर. सोनवणे, व्हि.बी.सोनवणे, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी, सत्कारमुर्तीचे नातलग, विद्यालयातील निवृत्त माजी मुख्याध्यापक,शिक्षक आदि उपस्थित होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती पूजनाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा अध्यक्ष त्याचा अध्यक्षिय सूचना प्रा.ए.टी.दांडगे यांनी तर अनुमोदन श्री.एस.आर.पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मिठूलालजी अग्रवाल यांच्या हस्ते सत्कारमूर्ती श्री.मोरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.यासह संस्थेच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापिका ति.र.बरडिया मराठी शाळा,रोस पेटल्स इंग्लिश मेडियम स्कूल, प्रगती बालवाडी तथा सत्कारमूर्ती यांच्या नातेवाईकांच्या हस्ते सुध्दा त्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारमुर्ती श्री.मोरे यांचे विषयी विद्यालयातील मुख्य लिपिक व्हि.एस.अंबुस्कर,प्रा.पराग जोशी, मुख्याध्यापक श्री.बडगुजर,बोदवड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल आदींनी मनोगते व्यक्त करतांना आपले अनुभव कथन केले.

सत्कारमूर्ती श्री.मोरे यांनी सत्काराला उत्तर देतांना आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला व संस्थेविषयी ऋणनिर्देश व्यक्त केले.आपल्या अध्यनीय भाषणात संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल यांनी सत्कारमूर्ती श्री.मोरे यांना भावी आयुष्य सुखमय व आरोग्यमय जावो अश्या सदिच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.सुत्रसंचालन प्रा.ई.आर.पाटील यांनी तर आभार श्री.ए.आर.पाटील यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता श्री.एस.एस.नंदवे यांनी ’वंदेमातरम’ने झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.